सातारा जिल्ह्याचा दहावीचा 96.75 टक्के निकाल


दैनिक स्थैर्य । 14 मे 2025। सातारा। इयत्ता दहावीसाठी सातारा जिह्यातील 37 हजार 312 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 37 हजार 203 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 35 हजार 997 विद्यार्थी उत्तीर्ण हेवून 96.75 टक्के निकाल लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेत टक्का घसरला आहे. नेहमीप्रमाणे मुलांच्या तुलनेत मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ज्यादा असून मुलींची टक्केवारी 98.08 टक्के आहे तर मुलांची 95.52 टक्के आहे. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी त्यांची गुणपत्रके लगेच मोबाईलवर डाऊनलोड करुन जल्लोष करत पुढच्या शिक्षणाच्या वाटा शोधू लागले आहेत.

सातारा जिह्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल दुपारी ऑनलाईन जाहीर करण्यात आला. महामंडळाने वेबसाईटवर निकाल प्रसिद्ध करताच ज्यांच्या घरातील दहावीची परीक्षा दिलेले विद्यार्थी होते त्यांनी त्यांचा निकाल लगेच बघितला. त्यामुळे किती टक्के पडले, पास, नापास हे समजले. सातारा जिह्यातून नियमितसाठी सातारा जिह्यात 739 माध्यमिक शाळां आणि 116 परीक्षा केंद्रावर ही परीक्षा झाली होती. 37 हजार 312 विद्यार्थ्यांनी नोदंणी केली होती. त्यापैकी 37 हजार 203 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 35 हजार 997 विद्यार्थी उत्तीर्ण हेवून 96.75 टक्के निकाल लागला आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर पुढील शिक्षणाच्या अनुषंगाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबामध्ये चर्चा मसलती सुरु झाल्या, कोणी सायन्सला जायचे तर कोणी परिस्थितीमुळे आर्ट साईड घ्यायची, अशी चर्चा रंगत होती.

गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी सातारा जिह्याचा टक्का घसलेला आहे गतवर्षी 97.19 टक्के निकाल लागला होता. यावर्षी 96.75 टक्के निकाल लागला असून कोल्हापूर विभागात सातार्‍याचा दुसरा क्रमांक आलेला आहे.

मुले आणि मुलींच्यामध्ये तफावत पाहिली असता मुलींचे प्रमाण उत्तीर्ण होण्यामध्ये जास्त आहे. नियमितमध्ये 19 हजार 319 मुलांनी नोदणी केली होती. त्यापैकी 19 हजार 261 मुले परीक्षेला बसली होती. त्यापैकी 18 हजार 399 विद्यार्थी उत्तीर्ण होवून 95.52 टक्के मुलांचा निकाल लागला आहे. तर 17 हजार 993 मुलींनी नोंदणी केली होती. त्यापैकी 17 हजार 942 मुली परीक्षेला बसल्या होत्या. त्यापैकी 17 हजार 598 मुली उत्तीर्ण होवून 98.08 टक्के निकाल लागला आहे.

रिपीटरसाठी सातारा जिह्यातून 557 विद्यार्थ्यांची नोंदणी केली होती. त्यामधील 550 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यातील 221 विद्यार्थी उत्तीर्ण होवून 40.18 टक्के निकाल लागलेला आहे. गतवर्षी मार्च 2024मध्ये सातारा जिह्यात चार गैरप्रकार उघडकीस आले होते. यावर्षी 2 गैरप्रकार उघडकीस आले. त्या विद्यार्थ्यांची त्या विषयाची संपादणूक रद्द करण्याची शिक्षा देण्यात आली आहे, अशी माहिती माध्यमिकचे शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे यांनी दिली.

फेब्रुवारी मार्च 2025 मध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेत कोल्हापूर विभागीय मंडळात कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबवण्यात आले. बारावी प्रमाणे दहावी मध्ये दोन्ही मंडळांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. राज्यात निकालात व कॉपीमुक्त अभियानात कोकण व कोल्हापूर विभाग अव्वल आहे. राजेश क्षीरसागर यांनी विभागीय अध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून कोल्हापूर विभागात कॉपीमुक्त अभियान जोरकसपणे राबविण्यात आले. कोल्हापूर विभागात तर डिसेंबर 2024 पासूनच मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात आली.
राजेश क्षीरसागर, विभागीय अध्यक्ष, कोकण व कोल्हापूर विभागीय मंडळ.


Back to top button
Don`t copy text!