सातारा शहर पोलीसांनी संगमनगर येथे गुटखा पकडला; दोघांवर गुन्हा दाखल

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि.२५ मार्च २०२२ । सातारा । संगमनगर येथे सातारा शहर पोलिसांनी कारवाई करुन सव्वा दोन लाखाचा मुद्देमाल पकडला. यामध्ये छोटा हत्ती व १२ हजार रुपयांच्या गुटख्याचा समावेश आहे. दरम्यान, याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

युवराज पांडूरंग पोळ (वय ३७, रा. कोंडवे ता. सातारा) व गणेश मोरे (रा. पाचवड ता. वाई) या दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.याबाबत अधिक माहिती अशी, ही कारवाई दि. २२ रोजी सांयकाळी संगमनगर येथे करण्यात आली आहे. संशयित युवराज पोळ याच्याकडे १२ हजार रुपयांचा गुटखा सापडला. त्याच्याकडे प्राथमिक चौकशी केली असता त्याने तो गुटखा गणेश मोरे याच्याकडून विकत घेल्याचे सांगितले. पोलिसांनी त्यानुसार गुटखा व तो वाहतूक करण्यासाठी वापरलेला एमएच ११ एजी ९५२० या क्रमाकांचा छोटा हत्ती जप्त केला. ही कारवाई सपोनि चेतन मछले सहाय्यक फौजदार शशिकांत भोसले, पोलिस हवालदार निलम सुर्यवंशी, धनंजय दळवी, धनाजी यादव, पंकज मोहिते, अर्चना कदम यांनी केली.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!