
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा

स्थैर्य, सातारा, दि. २८ : सातारा शहर पोलिसांनी एका महिलेचा चोरीस गेलेले तब्बल 11 तोळे सोने परत दिले, महिलेचे भरून आले डोळे.
सातारा येथील कोडोली भागातील एका घरात 11 तोळे सोने चोरीस गेले होते त्या बद्दल सातारा शहर पोलिसात गुह्याची नोंद ही झाली होती, सातारा गुन्हे प्रकटीकरण शाखेने अवघ्या 7 दिवसात या चोरीचा छडा लावला आणी गुन्हेगारांना जेरबंद करून चोरीतील मुद्देमाल हसगत केला, सादर चा चोरीचे न्यायप्रविष्ट बाबी पूर्ण झाल्या नंतर आज चोरी गेलेला आयवज 11 तोळे सोने संबंधित महिलेला सातारा शहर पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांनी परत दिले, या वेळी संबंधित महिलेने सातारा पोलिसांचे सर्व टीम चे खूप खूप आभार मानले.
