सासकल शाळा व्यवस्थापन समितीची बिनविरोध निवड; शंकर मुळीक अध्यक्षपदी

सासकल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी शंकर मुळीक, तर उपाध्यक्षपदी दिनेश मुळीक यांची बिनविरोध निवड झाली आहे.

स्थैर्य, सासकल, दि. ०९ सप्टेंबर : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सासकलच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी शंकर मुळीक, तर उपाध्यक्षपदी दिनेश मुळीक यांची बिनविरोध निवड झाली. ग्रामपंचायत सासकल आणि सासकल जनआंदोलन समितीच्या वतीने नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले.

शाळेच्या गुणवत्तावाढीसाठी एकत्रित प्रयत्न

शाळेची शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि शाळेतील भौतिक सुविधांच्या विकासासाठी व्यवस्थापन समिती, शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांनी एकत्रित प्रयत्न करण्याची अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

शाळा व्यवस्थापन समितीमध्ये प्रकाश गोरे, तात्यासो मुळीक, अश्विनी घोरपडे, नामदेव मुळीक, दिनेश मुळीक, आरती धुमाळ, जया मदने, प्रिया मदने, शंकर मुळीक, संजिवनी मुळीक, संगिता खोमणे, रविना देवघरे आणि धनाजी खोमणे यांचा समावेश आहे. शिक्षणतज्ज्ञ राजेंद्रकुमार सस्ते यावेळी उपस्थित होते.

नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा

कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते मंगेश मदने, विनायक मदने, अनिल मुळीक, अतुल मुळीक, सागर चोपडे, नवनाथ खोमणे, नारायण मुळीक, बाळू आडके, सचिन पिसाळ, नामदेव मुळीक, सुरज मदने, निकिता घोरपडे यांच्यासह पालक उपस्थित होते.

मुख्याध्यापक अरुण कांबळे, उपशिक्षिका कीर्ती निकाळजे, शिक्षक सुधीर ढालपे, उपशिक्षिका चारुशीला जगदाळे आणि गोरे मॅडम यांचीही उपस्थिती होती. प्रभारी सरपंच सोनाली मदने आणि ग्रामपंचायत सदस्यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

Back to top button
Don`t copy text!