सरसेनापती प्रतापराव गुजर पुरस्कार डॉ.येळगावकरांना प्रदान

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, दि ११: आपणा सर्वांचे भाग्य की आपण या मातीत जन्म घेतला,आता या सरसेनापतींचा वारसा जतन करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊया आवाहन माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी केले. भोसरे येथे सरसेनापती प्रतापराव गुजर स्मृती अधिष्ठान पुरस्कार माजी आमदार डॉ दिलीपराव येळगावकर यांना देण्यात आला यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी सभापती संदीप मांडवे,प्रा.सुधीर इंगळे,शहाजी गुजर, मोहनराव देशमुख, सपोनि उत्तम भापकर,शंकर माळी, जुबेर इनामदार,आरबाज शेख,विष्णुशेठ जाधव,तानाजी देशमुख,सरपंच नीता मदने,उपसरपंच सतीश जाधव,डॉ ऊर्मिला येळगावकर,नितीन पाटील,महादेव जाधव,संतोष जाधव,कैलास गुजर,अविनाश गुजर,ग्रामसेवक गावडे,तलाठी बीडकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना घार्गे म्हणाले की,एका महान व्यक्तीसाठी जी काही मदत करता येईल ती करणार आहे.त्यांच्या वारसांचे सन्मानाने पुनर्वसन करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करू. सत्कारमूर्ती डॉ दिलीप येळगावकर म्हणाले की,हा पुरस्कार माझ्यासाठी सर्वोच्च पुरस्कार आहे.या गावाला प्रथम ‘क’ वर्ग दर्जा मिळवून दिला व त्यानंतर पाठपुरावा करून ‘ब’ वर्ग मिळवून दिला.सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या ऐतिहासिक वाड्याच्या संवर्धनासाठी शासन दरबारी पाठपुरावा करणार असून ग्रामपंचायतीने गावठाण वाढीचा प्रस्ताव द्यावा तिथे वारसांना जागा उपलब्ध करून सरसेनापती प्रतापराव गुजर नगर उभे करण्यासाठी मी प्रयत्न करेन तसेच प्रत्येक वर्षी या सोहळ्यासाठी माझी अकरा हजार रुपये देणगी देण्याचे वचन डॉ येळगावकर यांनी दिले.

यावेळी संदीप मांडवे,सुधीर इंगळे,उत्तम भापकर यांनीही मार्गदर्शन केले.महादेव जाधव यांनी प्रास्ताविक तर तानाजी देशमुख यांनी सूत्रसंचालन केले.


Back to top button
Don`t copy text!