राजधानीत सरदार पटेल जयंती आणि इंदिरा गांधी स्मृतिदिनी अभिवादन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. ०१ नोव्हेंबर २०२२ । नवी दिल्ली । देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती दिनी व देशाच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या स्मृतिदिनी महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्र येथे अभिवादन करण्यात आले.

कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात सचिव तथा निवासी आयुक्त (अ.का.) डॉ. निधी पांडे यांनी सरदार पटेल व इंदिरा गांधी  यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश आडपवार, निलेश केदार यांच्यासह महाराष्ट्र सदनातील अधिकारी -कर्मचारी  उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी सरदार पटेल व इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

सरदार वल्लभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त ‘भ्रष्टाचार मुक्त भारत-विकसित भारत’ या संकल्पनेतंर्गत ‘भ्रष्टाचार निर्मूलनाची प्रतिज्ञा’ घेण्यात आली. तसेच  इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी ‘राष्ट्रीय एकता दिवस’ म्हणून पाळण्यात येते. यानिमित्तही शपथ घेण्यात आली.

महाराष्ट्र परिचय केंद्रात सरदार पटेल व इंदिरा गांधी  यांना अभिवादन

महाराष्ट्र परिचय केंद्रात  सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आणि इंदिरा गांधी यांच्या स्मृतिदिनी  महाराष्ट्र परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी तथा उपसंचालक (अ.का.) अमरज्योत कौर अरोरा  यांनी सरदार पटेल व इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. माहिती अधिकारी अंजु निमसरकर-कांबळे यांच्यासह उपस्थित कर्मचा-यांनी यावेळी सरदार पटेल व इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

श्रीमती अरोरा यांनी यावेळी उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांना भ्रष्टाचार निर्मूलनाची प्रतिज्ञा तसेच ‘राष्ट्रीय एकता दिवस’ ची  शपथ दिली.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!