डंपर चालकास मारहाण करून लुटणारा सराईत जेरबंदसातारा तालुका डी. बी. पथकाची कारवाई 

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

स्थैर्य, सातारा, दि.१५: आरफळ, ता. सातारा येथे डम्पर बंद पडल्याने थांबलेल्या चालकास एकाने वडूथजवळ निर्जन स्थळी नेले. यानंतर चालकास मारहाण करून खिशातून जबरदस्तीने दोन हजार लुटले. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर सातारा तालुका पोलिसांनी सराईत चोरट्यास जेरबंद केले आहे. अविनाश विलास दडस, रा. आरफळ, ता. सातारा असे संशयीताचे नाव आहे. 

याबाबत माहिती अशी, दि. 12 रोजी संबंधित डंपर चालक वाढे फाटा ते फलटण रोडने डम्पर घेवून जात होता. आरफळ, ता. जि. सातारा गावच्या हद्दीमध्ये डंपर एअर पकडल्याने बंद पडलेला होता. त्यावेळी एक छोटा टेम्पो त्याठिकाणी येवून थांबला. संबंधित टेम्पो चालकाने डंपर चालकास तू काही दिवसांपूर्वी माझ्या गाडीला धडक दिली होती. माझ्या मालकाला भेटायला चल असे म्हणाला. डंपर चालकाने माझ्याकडून कोणताही अपघात झालेला नाही, असे सांगितले. तरीदेखील खात्री करण्यासाठी संबधित चालकासोबत मालकास भेटण्यास जावू असे सांगितले. त्यावेळी टेम्पो चालकाने त्यास टेम्पोमध्ये बसून वडूथ, ता. जि. सातारा गावचे हद्दीमध्ये एक कॅनालवर निर्जन ठिकाणी घेवून गेला. तेथे गेल्यावर डम्पर चालकाने मला याठिकाणी का आणले आहे, तुझे मालक कुठे आहेत, अशी विचारणा केली. तेव्हा संशयीताने मालक वगैरे काही नाही असे सांगून डंपर चालकाच्या खिशातील पैसे जबरदस्तीने काढू लागला. डंपर त्यास विरोध केला. परंतु, संशयीताने जबरदस्ती करून झटापट करून त्याच्या खिशातील दोन हजार घेवून टेम्पो घेवून पळून गेला. याबाबत बाळकृष्ण दत्तात्रय भुजबळ रा. झणझणे (सासवड) ता. फलटण जि. सातारा यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यास तक्रार दिली होती.

त्यानुसार सातारा तालुका पोलिसांच्या डी. बी. पथकाने कौशल्यपूर्वक माहिती मिळवून आरोपीचे वर्णन प्राप्त केले. वर्णनावरून एका संशयितास ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता पोलिसांना प्राथमिक चौकशीमध्ये उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु, पोलिसांनी केलेल्या प्रश्‍नाच्या भडिमारापुढे तो बोलता झाला व त्याने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. 

संबंधित सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर लुटमारीचे विविध पोलीस ठाणेस गुन्हे दाखल आहेत. सध्या तो तडीपार कालावधी संपलेला असल्याने त्याचे गावी आलेला होता. सदरचा इसम अत्यंत सराईत गुन्हेगार असल्याने 

ही कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधिक्षक धीरज पाटील, सहाय्यक पोलीस अधीक्षक श्रीमती आँचल दलाल सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सजन हंकारे, डी. बी. पथकातील हवालदार दादा परिहार, पो.ना. सुजीत भोसले, पो. कॉ. सागर निकम, पो. कॉ. सतीश पवार, पो. कॉ. नितीराज थोरात, पो. कॉ. संदीप कुंभार, पो. ना. निलेश जाधव, पो. ना. ओंकार यादव, पो. ना. अमित माने यांनी केली. तपास पो. उपनिरीक्षक ज्ञानेश्‍वर दळवी करत आहेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!