
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा

स्थैर्य, फलटण, दि. 24 : सातारा जिल्ह्यात संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच्या तरडगावच्या मुक्कामानंतर माऊलींचा सोहळा फलटणकडे रवाना होतो आजच्या दिवशी फलटण येथील विमानतळ परिसरातील पटांगणावर लाखो वारकरी विसावा घेतात मात्र कोरोनामुळे सोहळा रद्द झाल्याने फलटणमध्ये प्रतिकात्मक सोहळा समाजआरती करून साजरा करण्यात आला
कोरोनामुळे सर्वच ठिकाणी पालखी सोहळा रद्द करण्यात आल्याने अनेकवर्षाची पालखीची परंपरा खंडित झाली त्यामुळे भक्तजन नाराज असले तरी आजचा पालखी सोहळ्याचा फलटण मुक्काम गृहीत धरून काही भाविकांनी सायंकाळी पालखी तळावर प्रतिकात्मक समाजआरती केली ज्ञानेश्वर माऊलीचा जयघोष करण्यात आला ही समाज आरती मोजक्या लोकांच्या उपस्थितीत सोशल डिस्टन्सचे पालन करून करण्यात आली प्रसादाचे वाटप करण्यात आले
