श्रीमंत संजीवराजे शरद पवार गटात प्रवेश करणार?; मोहिते – पाटलांची साथ देणार?

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. 14 एप्रिल 2024 | फलटण | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे सातारा जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर हे आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करण्यात असल्याच्या चर्चा सध्या माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये सुरू आहेत.

माढा लोकसभा मतदारसंघांमधून निवडणूक लढवण्यासाठी श्रीमंत संजीवराजे हे इच्छुक होते. परंतु महायुतीच्या माध्यमातून माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवारी न मिळाल्याने विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे महायुतीचे काम न करता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षांमध्ये प्रवेश करून धैर्यशील मोहिते पाटील यांचे उघडपणे काम करणार असल्याच्या चर्चा सुद्धा रंगू लागल्या आहेत.

फलटण तालुक्यामध्ये राजे गटाचे पारंपरिक विरोधक म्हणून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची ओळख आहे. महायुतीच्या माध्यमातून खासदारकीसाठी त्यांचेच काम करावे लागणार असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटात प्रवेश करून रणजितसिंह यांच्या विरोधात कामकाज करणार आहेत; असेही मत व्यक्त केले जात आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!