
थेट WhatsApp वर मिळवा
ढवळ येथील कै. गजानन नामदेव लोखंडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त २६ नोव्हेंबर रोजी कीर्तन आणि विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचे आयोजन केले आहे.
स्थैर्य, फलटण, दि. २४ नोव्हेंबर : ढवळ (ता. फलटण) येथील कै. गजानन नामदेव लोखंडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त गुरुवार, दि. २६ नोव्हेंबर रोजी विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने शाळेतील पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना स्कूल बॅग आणि शालेय उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात येणार असून, लोखंडे परिवाराच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
कीर्तन, पुष्पवृष्टी आणि मान्यवरांची उपस्थिती
लोखंडे परिवाराच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात गुरुवारी सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत ह.भ.प. सागर महाराज बोराटे यांचे फुलांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे. त्यानंतर दुपारी १२ वाजून ०५ मिनिटांनी कै. गजानन लोखंडे यांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी करून त्यांना आदरांजली वाहिली जाईल. या कार्यक्रमासाठी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, सौ. जिजामाला नाईक निंबाळकर आणि युवा नेते अमरसिंह नाईक निंबाळकर यांची उपस्थिती लाभणार आहे.
विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची भेट
गजानन लोखंडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सामाजिक बांधिलकी जपत लोखंडे परिवाराने शैक्षणिक उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. कार्यक्रमादरम्यान शाळेतील पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्व मुलांना स्कूल बॅग तसेच शालेय उपयोगी साहित्याचे वाटप केले जाणार आहे. ढवळ येथे होणाऱ्या या कार्यक्रमास ग्रामस्थ व हितचिंतकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन समस्त लोखंडे परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.



