सांगवीचे माजी उपसरपंच दिनानाथ पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, सांगवी, दि. ०८ सप्टेंबर : सांगवी गावचे ज्येष्ठ नेते कै. दत्तात्रय गोविंदराव बेलदार पाटील यांचे चिरंजीव आणि गावचे माजी उपसरपंच दिनानाथ दत्तात्रय पाटील यांनी, दत्तात्रय ठोंबरे यांच्यासह भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर आणि स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अमरसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला.

दिनानाथ पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे सांगवी गावच्या राजकारणात नवी समीकरणे उदयास येण्याचे संकेत मिळत आहेत. त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्त्यांनी भाजपला पाठिंबा दर्शवला आहे.

या पक्षप्रवेशावेळी गावचे माजी सरपंच नानासाहेब मोहिते, माजी उपसरपंच मच्छिंद्र निकम, प्रदीप मोहिते, संजय जगताप, सागर खरात, ठोंबरे परिवार आणि नानासाहेब आडके यांच्यासह गावातील प्रमुख कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!