शताब्दी वर्षात सांगवी सोसायटीचा मोठा निर्णय; मुबारक शेख व्हाईस चेअरमनपदी

फलटण तालुक्यातील सांगवी विविध कार्यकारी सोसायटीच्या व्हाईस चेअरमनपदी अल्पसंख्याक समाजातील मुबारक शेख यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. संस्थेच्या या ऐतिहासिक व सर्वसमावेशक निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

स्थैर्य, सांगवी, दि. १९ ऑगस्ट : फलटण तालुक्यातील सांगवी विविध कार्यकारी सोसायटीच्या व्हाईस चेअरमनपदी मुबारक अब्बास शेख यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. संस्थेच्या शताब्दी वर्षात अल्पसंख्याक समाजातील सदस्याला थेट सर्वोच्च पदावर संधी दिल्याने सहकार वर्तुळात नवा आदर्श प्रस्थापित झाला आहे.

शताब्दी वर्षात ऐतिहासिक निर्णय

सांगवी सोसायटीच्या १०० वर्षांच्या कारकिर्दीत नुकताच निशा जाधव या महिलेला चेअरमन पदाची धुरा सोपवण्यात आली होती. या निर्णयानंतर आता मुबारक शेख यांची व्हाईस चेअरमनपदी निवड करून संस्थेने आणखी एक सर्वसमावेशक पाऊल उचलले आहे. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील तसेच हनुमंतराव मोहिते आणि नानासो मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड प्रक्रिया पार पडली.

सर्वसमावेशक वाटचालीचे कौतुक

संस्थेच्या विशेष बैठकीत या महत्त्वपूर्ण निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. यावेळी मावळते पदाधिकारी रामदास ठोंबरे, हरिदास भगत यांच्यासह संचालक मंडळ आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवनिर्वाचित चेअरमन निशा जाधव व व्हाईस चेअरमन मुबारक शेख यांना शुभेच्छा देताना हनुमंतराव मोहिते यांनी संस्थेच्या या धाडसी पाऊलाचे विशेष कौतुक केले. या निवडीबद्दल सांगवीसह संपूर्ण फलटण तालुक्यातून पदाधिकाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Back to top button
Don`t copy text!