लायन्स क्लब ऑफ फलटण गोल्डनच्या अध्यक्षपदी संध्या गायकवाड, सचिवपदी उज्ज्वला निंबाळकर

नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उद्या प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूलमध्ये; भोजराज नाईक निंबाळकर पदप्रदान अधिकारी

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, फलटण, दि. १७ ऑगस्ट : लायन्स क्लब ऑफ फलटण गोल्डनच्या २०२५-२६ या वर्षासाठीच्या नूतन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये अध्यक्षपदी लायन संध्या गायकवाड, सचिवपदी लायन उज्ज्वला निंबाळकर आणि खजिनदारपदी लायन सुनिता कदम यांची निवड झाली आहे.

या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण आणि शपथविधी समारंभ सोमवार, दि. १८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता कोळकी येथील प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यासाठी पदप्रदान अधिकारी म्हणून लायन भोजराज नाईक निंबाळकर, तर नूतन सदस्य शपथप्रदान अधिकारी म्हणून डिस्ट्रिक्ट चेअरमन लायन सुहास निकम हे काम पाहणार आहेत. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रांत चेअरमन लायन जगदीश करवा उपस्थित राहणार आहेत.

या नूतन कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्षपदी लायन सीता जगताप, तर मावळत्या अध्यक्ष म्हणून लायन स्वाती चौरमले या काम पाहतील.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!