
दैनिक स्थैर्य । 3 जून 2025। फलटण । भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष, ग्राहक समितीचे प्रदेशाध्यक्ष संदीपकुमार कैलास जाधव यांनी त्यांच्या समर्थकांसह पालकमंत्री ना. शंभूराज देसाई, संपर्कप्रमुख शरद कणसे, जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
एक तरुण कार्यकर्ता भारतीय जनता पार्टी हा पक्ष का सोडून जातो, अशी चर्चा फलटण शहरात होत होती. संदीपकुमार कैलास जाधव यांनी एका खाजगी युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमुळे चर्चेत होते.
पालकमंत्री ना शंभूराज देसाई म्हणाले, संदीपकुमार जाधव यांच्या प्रवेशामुळे फलटण शहर व तालुक्यामध्ये शिवसेनेची ताकद वाढणार आहे. त्यांनी व त्यांच्या सहकार्यांनी पक्षवाढीसाठी काम करावे. पक्ष संघटन मजबूत करावे. त्यांचे भविष्य चांगले असेल.
शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघे साहेब यांचे विचार तसेच पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या कामाने प्रभावित होऊन शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे मत संदीपकुमार जाधव यांनी व्यक्त केले.
संदीपकुमार जाधव यांच्यासमवेत प्रकाश नांदेले, स्वाती फुलारी, प्रकाश बोधे – इनामदार ,ऋषिकेश नलावडे, आनंद सुतार, अनुप पवार, तुषार फरतडे, शरद बनकर, प्रेम घाडगे, अशा अनेक कार्यकर्त्यांना शिवसेनेत पक्षप्रवेश केला.
यावेळी उपजिल्हाप्रमुख अविनाश फडतरे, विधानसभा संघटक विराज खराडे, तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर पवार, तालुका प्रमुख नानासो इवरे, तालुकाप्रमुख हेमंत सुतार, शहर प्रमुख निलेश तेलखडे, गणेश चोरमले उपस्थित होते.

