फलटण शहरातील मार्गासाठी ७५ कोटींची मंजुरी; खासदार रणजितसिंह यांची माहिती


दैनिक स्थैर्य | दि. 10 फेब्रुवारी 2024 | फलटण | फलटण शहरामधून जो पालखी मार्ग जात आहे. म्हणजे शहरामध्ये प्रवेश केल्यानंतर ज्या मार्गावरून प्रत्येक्षात पालखी जात आहे. त्या मार्गासाठी ना. नितीन गडकरी यांच्याकडे विशेष निधीची मागणी आपण केली होती. त्यास आता मंजुरी मिळाली असून ७५ कोटी रुपयांचा निधी त्यासाठी मंजूर करण्यात आला आहे; अशी माहिती खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली.

कोळकी येथील आयोजित पत्रकार परिषदेत खासदार रणजितसिंह बोलत होते. यावेळी भारतीय जनता पार्टीचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना खासदार रणजितसिंह म्हणाले कि; फलटण शहरामधून जो प्रत्येक्ष पालखी मार्ग जात आहे. त्याच्या निधीसाठी आपण ना. नितीन गडकरी यांच्याकडे मागणी केली होती. त्याला ना. गडकरी यांनी मंजुरी दिली असून शहरातील पालखी मार्गासाठी ७५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये शहरामधून जो पालखी मार्ग जात आहे. तो मार्ग संपूर्ण सिमेंट रास्ता व जे छोटे, मोठे चौक आहेत; ते सुद्धा सुशोभीकरण करण्यात येणार आहे. यासोबतच पालखी मार्ग ते नाईकबोंबवाडी एमआयडीसी पर्यंत जाणाऱ्या रस्त्यासाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.


Back to top button
Don`t copy text!