श्रीमंत रामराजे यांच्या वक्तव्यावर “नो कमेंट्स” : खासदार रणजितसिंह

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. 10 फेब्रुवारी 2024 | फलटण | काल सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार जयकुमार गोरे यांच्यावर सडकून टीका केली होती. त्यावर खासदार रणजितसिंह यांना याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारले असता असता गालात हसत “नो कमेंट्स” असे उत्तर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिले.

कोळकी येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये खासदार रणजितसिंह बोलत होते. यावेळी भारतीय जनता पार्टीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

फलटण – बारामती व फलटण – पंढरपूर रेल्वेची पाहणी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांनी केली आहे. २०२५ वर्षाच्या अखेर फलटण – बारामती रेल्वे प्रत्येक्षात सुरु होणार आहे; असे यावेळी रेल्वे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!