संपतराव भोसले व पोपटराव भोसले या पिता-पुत्रांचे एकाच दिवशी निधन; राजाळे गावावर शोककळा


स्थैर्य, गोखळी दि.4: फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील राजाळे येथील संपतराव मारुतराव भोसले (वय 80) यांचे बुधवार दिनांक 3 रोजी पहाटे साडेपाच वाजता निधन झाले. तर त्यांचे चिरंजीव पोपटराव संपतराव भोसले (वय 61) यांचे पुणे येथे उपचारादरम्यान मंगळवारी मध्यरात्री निधन झाले. पिता पुत्रांचे एकाच दिवशी निधन झाल्याने संपूर्ण राजाळे गावावर दुःखाचे सावट पसरले आहे. या दुखःद घटनेचे वृत्त समजताच राजाळे गावातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते.

संपतराव भोसले उर्फ नाना यांनी राजाळे गावचे उपसरपंच पद भूषवले होते. सामाजिक धार्मिक कार्यात त्यांचा सहभाग होता. स्वर्गीय हणमंतराव पवार यांचे ते कट्टर समर्थक होते. ते माजी सनदी अधिकारी विश्‍वासराव भोसले यांचे चुलते होते. त्यांचे पश्‍चात तीन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.

तर पोपटराव भोसले यांचे पश्‍चात पत्नी ,एक, मुलगा एक मुलगी, एक बहीण व तीन भाऊ असा मोठा परिवार आहे त्यांनी फलटण येथील श्रीराम निरा व्हॅली डिसलरीचे मॅनेजरपद काही काळ सांभाळले होते. सामाजिक धार्मिक कार्यात त्यांचा सहभाग होता. माजी सनदी अधिकारी विश्‍वासराव भोसले यांचे चुलत बंधू होते.


Back to top button
Don`t copy text!