विक्रम भोसले अजितदादा पवारांच्या भेटीला;विकासकामांसाठी सर्वतोपरी सहकार्याचे दिले आश्‍वासन


स्थैर्य, जिंती, दि.4: फलटण तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या साखरवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत माजी सरपंच विक्रमसिंह भोसले यांच्या गटाने राजे गट पुरस्कृत पॅनेलचा पराभूत केल्यानंतर विक्रमसिंह भोसले यांनी नुकतीच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ना.अजितदादा पवार यांची भेट घेतली. यावेळी ना.अजितदादा पवार यांनी विकासकामांसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्‍वासन विक्रमसिंह भोसले यांना दिले.
साखरवाडी (पिंपळवाडी) ता.फलटण ग्रामपंचायतीवर गेल्या पंचवार्षिक निवडणूकीत राजे गटाचीच सत्ता होती. याकाळात राजे गटाचे विश्‍वासू विक्रमसिंह भोसले यांनी सरपंचपदाची धुरा सांभाळली होती. मात्र नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत पक्षांतर्गत फुट पडल्याने विक्रमसिंह भोसले यांनी स्वतंत्र पॅनेल उभे करुन राजे गटाच्या विरोधात निवडणूक लढवून 9 विरुद्ध 7 असा दणदणीत विजय मिळवला. त्यानंतर नुकत्याच झालेल्या सरपंच – उपसरपंच निवडीवेळी साखरवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी विक्रमसिंह भोसले गटाच्या रेखा संजय जाधव यांची तर प्रल्हादराव पाटील गटाचे अक्षय किरण रूपनवर यांची उपसरपंचपदी निवड झाली.
या सार्‍या राजकीय घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर विक्रमसिंह भोसले यांनी ना.अजितदादा पवार यांची भेट घेवून ते राष्ट्रवादी काँग्रेसच्याच माध्यमातून कार्यरत राहणार असल्याचे संकेत दिले आहेत.


Back to top button
Don`t copy text!