दादासाहेब चोरमले यांना शासनाचा समाजभुषण पुरस्कार जाहीर


दैनिक स्थैर्य | दि. 08 मार्च 2024 | फलटण | महाराष्ट्र शासनाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्रदान करून व्यक्ती/ संस्था यांचा सन्मान करण्यात येत असते. सन 2021 – 22 सालासाठी फलटण येथील महात्मा एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारी अध्यक्ष कृष्णात उर्फ दादासाहेब चोरमले यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे; याबाबतचा शासन निर्णय निर्गमित झाला आहे.

गेली ३० वर्षे दादासाहेब चोरमले हे सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. मुंजवडी येथील श्रीराम खोलेश्वर माध्यमिक विद्यालयाचे ते प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत.

दादासाहेब चोरमले यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांचे सामाजिक, शैक्षणिकसह सर्वच क्षेत्रामधून अभिनंदनांचा वर्षाव होत आहे.

विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, फलटण नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष पांडुरंग गुंजवटे, क्रांतीसुर्य प्रतिष्ठानचे संस्थापक मिलिंद नेवसे यांच्यासह विविध मान्यवरांनी दादासाहेब चोरमले यांचे पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अभिनंदन केले.


Back to top button
Don`t copy text!