
दैनिक स्थैर्य । 10 मे 2025। फलटण । श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटण येथील यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण, सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण, नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) महाविद्यालय फलटण व सौ वेणूताई चव्हाण डी फार्मसी कॉलेज फलटण या चारही शाखांच्या संयुक्त विद्यमाने स्व. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा 66 व्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे उपाध्यक्ष बापूसाहेब मोदी, उपाध्यक्ष सी. एल. पवार, मानद सचिव डॉ. सचिन सुभाषराव सूर्यवंशी (बेडके) यांच्याहस्ते स्व. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
प्रा. एस. डी. यादव व प्रा. जी. बी. वाघ, प्रा. शेख यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या आठवणींना उजाळा मनोगतातून दिला.
डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) यांनी श्रीराम एज्युकेशन सोसायटीचा व कर्मवीर भाऊराव पाटील यांचा ऋणानुबंध सांगितल्या. आजच्या पिढीने कर्मवीर भाऊराव पाटील यांचे विचार आचरणात आणून पुढे घेऊन जावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.
या कार्यक्रमासाठी प्राचार्य, उपप्राचार्य, पर्यवेक्षक, प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन प्र.प्राचार्य पी. डी. घनवट यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रा. एस. एन. राऊत सूत्रसंचालन केले. प्रा. सौ. एस. जी. धुमाळ यांनी आभार मानले.