
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य । दि. २४ जुलै २०२३ । मुंबई । लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती आज विधान भवनात साजरी करण्यात आली. याप्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळाचे सचिव (१) (कार्यभार) जितेंद्र भोळे यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळाचे उप सचिव (विधी) श्रीमती सायली कांबळी, अवर सचिव श्री.विजय कोमटवार यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही लोकमान्य टिळक यांच्या अर्धपुतळ्यास गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.



