सातार्‍यात सहस्त्रचंडी याग सोहळ्याला मोठ्या उत्साहात प्रारंभ

रविवारी दुपारी 2 ते 5 या वेळेत एक सहस्त्र कुमारिका पूजनाचे आयोजन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

सातारा – सहस्त्रचंडी महायाग व सप्तशती देवी स्तुती या विषयावर मार्गदर्शन करताना वेदमूर्ती विवेकशास्त्री गोडबोले समोर उपस्थित शेकडो यजमान.

स्थैर्य, सातारा, दि. 5 ऑक्टोबर : येथील श्री पंचपाळी हौद दुर्गा माता मंदिर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने शाहू नगरीत प्रथमच आयोजित केलेल्या सहस्त्रचंडी याग सोहळ्याला मोठ्या उत्साहात आणि हजारो देवी भक्तांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला . शनिवारी सकाळी सातारचे लाडके खासदार श्री .छ. उदयनराजे भोसले व त्यांच्या सुविध्य पत्नी श्री .छ.सौ दमयंतीराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत वेदमूर्ती ओंकार शास्त्री बोडस यांच्या मार्गदर्शनाखाली प्रधान संकल्प सोडून या सहस्त्रचंडी महायाग सोहळ्याला प्रारंभ झाला. राजवाडा परिसरातील पंचपाळी हौद दुर्गा माता मंदिर परिसरात यानिमित्त भव्य मंडप उभारण्यात आला असून कोल्हापूर येथील साडेतीन शक्तीपीठापैकी एक समजल्या जाणार्‍या श्री महालक्ष्मी देवीचा प्रसन्न चेहरा असलेली सोन्याच्या रत्नजडित सिंहासनावरील सुरेख मूर्ती या मंडपात प्रमुख मुख्य देवता म्हणून स्थापन करण्यात आली आहे.

तसेच महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी वणी येथील सप्तशृंगी देवी ,तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी, माहूरगड येथील रेणुका, आणि कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी देवींच्या प्रतिकृती विशेष मंडपात उभारण्यात आल्या असून त्यासमोर आज विविध जाती ,धर्म आणि पंथातील 151 देवी भक्तांनी सपत्नीक पुण्याहवाचनाचा कार्यक्रम संपन्न केला. यावेळी वेदमंत्रांच्या जयघोषात सुरू झालेल्या या सहस्त्रचंडी यागाचा प्रधान संकल्प खासदार उदयनराजे भोसले यांनी सोडल्यावर मंदिरातील दुर्गादेवीची विशेष पूजा संपन्न झाली.

मंदिर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने यावेळी या सोहळ्याचे प्रमुख यजमान धनंजय देशमुख आणि विनायक शास्त्री चिखलगे यांच्या हस्ते श्री .छ. उदयनराजे भोसले व श्री .छ.सौ दमयंती राजे भोसले यांचा शाल, श्रीफळ, प्रसाद भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. या सहस्त्रचंडी सोहळ्यात गणपती पूजन, पुण्याहवाचन, नांदी श्राद्ध, आचार्य वरण, प्रायश्चित्त होम, गोपूजन, स्थल शुद्धीसाठी उदकशांत, मुख्य देवता स्थापना ,नवग्रह स्थापना, नवग्रह होम सोहळ्यात धार्मिक विधी संपन्न झाल्यानंतर साडेअकरा वाजता वेदमूर्ती विवेकशास्त्री गोडबोले यांनी सहस्त्रचंडी महायाग व सप्तशती देवी स्तुती या विषयावर विस्तृत मार्गदर्शन केले.
सायंकाळी परगावाहून आलेल्या आणि यजमानपद भूषवलेल्या शेकडो यजमान आणि देवी अर्चना संपन्न केली. त्यानंतर सायंकाळी गंधतारा ढोल पथकाच्या वतीने मंदिर परिसरात ढोल वादन करून अभिवादन करण्यात आले तसेच सायंकाळी समर्थ सदन येथे समर्थ सेवा मंडळाचे अध्यक्ष श्री गुरुनाथ महाराज कोटणीस यांनी संत एकनाथ महाराजांच्या अभंगावर विस्तृत निरूपण केले. हे निरूपण प्रवचन पुढील दोन दिवस संपन्न होणार आहे या सहस्त्रचंडी महायागाचा प्रधान संकल्प सादर करताना वेदमूर्ती ओंकार शास्त्री बोडस व दिलीप शास्त्री अफळे म्हणाले की ,संपूर्ण विश्वात शांतता निर्माण व्हावी .हिंदू राष्ट्राची स्थापना व्हावी ,तसेच सध्या सुरू असलेले मंदिराचे सरकारीकरण थांबावे. देवीची 51 शक्तीपीठे जी विविध राष्ट्रात आहेत ,ती सर्व हिंदूस्थान या भारत देशाच्या भूमीत यावीत .तसेच पंचपाळे हौद दुर्गा माता मंदिराच्या वतीने संभाजी महाराजांची सृष्टी उभारण्याच्या तसेच गोशाळेच्या स्थापनेचा संकल्प या द्वारे करण्यात आला आहे .

शहरातील मोती चौकात दरवर्षी नवरात्री उत्सवात बसवण्यात जाणार्‍या दुर्गामाता मंदिराची नवीन चैतन्यदायी मूर्ती बनविण्याची संकल्पना पुढे घेऊन आज श्री .छ.उदयनराजे भोसले यांचे हस्ते या देवी मूर्तीचे मूर्तिकार संजय कुंभार यांना या मूर्तीचे बनविण्यासाठी विशेष धनादेश यावेळी प्रदान करण्यात आला. या सहस्त्रचंडी यागा साठी प्रमुख यजमान म्हणून मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष धनंजय देशमुख व त्यांच्या पत्नी सौ .अरुणा देशमुख तसेच ट्रस्टचे विश्वस्त विनायक चिखलगे व सौ.वंदना चिखलगे भूषवत आहेत. या सोहळ्यामध्ये पुढील सहा दिवस संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातून तसेच कोकण परिसरातून 51 ब्रह्मवृंद सहभागी झाले असून रविवारपासून या सोहळ्यात 65 ब्रह्मवृंद सहभागी होणार आहेत .दररोज नित्य हवन सादर होऊन रविवारपासून सप्तशती स्तोत्राचे दोनशे पाठ गुरुजी करणार असून वीस पाठांचे हवन केले जाणार आहे. तीळ, तूप या यागाला वापरले जाणार आहे अशी माहिती वेदमूर्ती ओंकार शास्त्री बोडस यांनी दिली.रविवार दि. 5 ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ ते दुपारी दोन या वेळेत सप्तशती पाठ वाचन व चंडी याग संपन्न होऊन दुपारी दोन ते पाच या वेळेत एक सहस्त्रकुमारीका पूजन म्हणजेच 1000 बालकुमारींचे पूजन करण्यात येणार आहे.

या सहस्त्रचंडी महायज्ञ यांच्या धार्मिक सोहळ्यासाठी राज्याच्या प्रमुख नेते, लोकप्रतिनिधी तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे सह विविध मान्यवरांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले असून या यज्ञाच्या आयोजनासाठी दुर्गा माता मंदिर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धनंजय देशमुख ,उपाध्यक्ष राजेंद्र साळुंखे ,सचिव शिवाजी उर्फ प्रशांत तुपे ,उपाध्यक्ष शिवाजी भोसले ,कोषाध्यक्ष प्रेमचंद पालकर यांचेसह हरीष शेठ, विनायक चिखलगे तसेच सर्व विश्वस्त व कार्यकारणी सदस्य हितचिंतक विशेष परिश्रम घेत आहेत .

सहस्त्रचंडी महायज्ञ साठी भक्तांकरीता 80 जी कलमानुसार देणगीदारांना इन्कम टॅक्स म्हणजेच आयकर खात्यातून सवलत मिळणार आहे तसेच या महायज्ञा साठी श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह मंडळचे अध्यक्ष सुभाषराव बागल, माजी नगराध्यक्ष अशोकराव मोने, समर्थ सेवा मंडळाचे कार्यवाह समर्थ भक्त योगेश बुवा रामदासी ,प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक श्रीधर कंग्राळकर,सातारा शिवसेना शहर प्रमुख निलेश मोरे, महेश राजेमहाडिक, चंद्रशेखर ढाणे, प्रकाश बडदरे तसेच सर्व साधक, सनातनी संस्था सातारा यांचे विशेष सहकार्य लाभत आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!