फलटणचे नवीन RTO सचिन विधाते: रिक्षाचालकांना मराठी बोलणे अनिवार्य, पारदर्शकतेची ग्वाही

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

फलटणचे नवनियुक्त उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सचिन विधाते यांचा सत्कार. रिक्षाचालकांना मराठी बोलणे अनिवार्य असून प्रशासकीय कामकाजात पारदर्शकतेची ग्वाही दिली.

स्थैर्य, फलटण, दि. २६ जून : फलटण येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून नुकतीच पदोन्नतीने नियुक्ती झालेले सचिन विधाते यांचा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिक्षा संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी सर्व रिक्षाचालकांना मराठी भाषा बोलणे अनिवार्य असल्याचे स्पष्ट केले.

कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

रिक्षा चालक आणि मालकांना मार्गदर्शन करताना सचिन विधाते यांनी सांगितले की, कार्यालयात विविध शासकीय कल्याणकारी योजनांच्या नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्वांनी या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. तसेच, प्रवासी वाहतूक करताना सर्व रिक्षाचालकांना व मालकांना मराठी बोलणे बंधनकारक राहील, अशी महत्त्वपूर्ण सूचना त्यांनी यावेळी दिली.

प्रशासकीय कामकाजात पारदर्शकतेवर भर

कार्यालयातील प्रलंबित वाहन परवाने (लायसन्स), फिटनेस प्रमाणपत्रे आणि थकीत कराची वसुली यांसारखी कामे जलदगतीने मार्गी लावली जातील. परिवहन कार्यालयातील संपूर्ण कामकाज अधिक गतिमान आणि पारदर्शक करण्यावर आपला विशेष भर असेल, अशी ग्वाही विधाते यांनी दिली.

या सत्कार प्रसंगी परिवहन कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच रिक्षा संघटनेचे अध्यक्ष दिनेश अहिवळे, उपाध्यक्ष सनी कदम यांच्यासह इतर पदाधिकारी आणि रिक्षाचालक उपस्थित होते.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!