काँग्रेस कमिटीच्या प्रदेश प्रतिनिधी पदी सचिन सुर्यवंशी बेडके तर फलटण तालुकाध्यक्ष पदी महेंद्र सुर्यवंशी बेडके यांची निवड

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, फलटण, दि. २४: सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या प्रदेश प्रतिनिधी पदावर फलटणमधून नगरसेवक सचिन सुभाषराव सूर्यवंशी – बेडके व राजेंद्र आनंदराव शेलार यांची निवड करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या फलटण तालुका अध्यक्ष पदी महेंद्र सुभाषराव सूर्यवंशी – बेडके तर फलटण शहर अध्यक्ष पदी पंकज चंद्रकांत पवार यांची निवड जाहीर करण्यात आलेली आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त अध्यक्ष व माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सातारा जिल्हा राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या प्रदेश प्रतिनिधी व ब्लॉक अध्यक्षांच्या निवडी नुकताच तालुकानिहाय जाहीर केलेल्या आहेत. अशी माहिती सातारा जिल्हा राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिलेली आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!