
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. २७ जानेवारी २०२५ | फलटण |
२५ जानेवारी २०२५ रोजी राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त फलटण विभागात कृषी सेवारत्न पुरस्कारप्राप्त सचिन जाधव यांनी मतदान जनजागृती (स्वीप)चे उत्कृष्ट काम केल्याबद्दल जिल्हाअधिकारी संतोष पाटील यांच्या हस्ते त्यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मानपूर्वक गौरव करण्यात आला.
याबद्दल सचिन जाधव यांना भाग्यश्री फरांदे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सातारा, उपविभागीय अधिकारी फलटण सचिन ढोले, उपविभागीय कृषि अधिकारी फलटण खलीद मोमीन, अभिजित जाधव तहसीलदार फलटण, तालुका कृषी अधिकारी फलटण दत्तात्रय गायकवाड, मंडळ कृषी अधिकारी विडणी शहाजी शिंदे, कृषी पर्यवेक्षक अजित सोनवलकर तसेच महसूल विभागाचे अधिकारी व कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
