
दैनिक स्थैर्य | दि. २३ ऑक्टोबर २०२४ | फलटण |
प्रसिद्ध लेखक व प्रेरणादायी व्याख्याते तसेच प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असणार्या सचिन गोसावी यांना अविष्कार जागतिक फौंडेशन, कोल्हापूर यांचेमार्फत दिला जाणारा सन २०२४ चा राज्यस्तरीय ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार नुकताच कोल्हापूर येथे प्रदान करण्यात आला.
ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत किसनराव कुर्हाडे तसेच इतर अनेक मान्यवरांच्या हस्ते त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असताना त्यांनी स्वतःची पाच प्रेरणादायी पुस्तके लिहिली आहेत. त्यांनी ललित गद्यपर लिहिलेल्या ‘आरंभ है प्रचंड’ या प्रेरणादायी पुस्तकाला संपूर्ण भारतभरातून मोठा प्रतिसाद लाभत आहे. तसेच समाजप्रबोधन व समाजपरिवर्तन हे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून ते संपूर्ण महाराष्ट्रभर प्रेरणादायी व्याख्याने करत आहेत. त्यांच्या या व्याख्यानांना संपूर्ण महाराष्ट्रभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे.
त्यांच्या या शैक्षणिक, सामाजिक व साहित्यिक कार्याची दखल घेऊन अविष्कार फौंडेशन, कोल्हापूर यांनी त्यांना कोल्हापूर येथे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार नुकताच प्रदान केला.
कोल्हापूर येथे पुरस्कार स्वीकारण्यासाठी सचिन गोसावी यांच्यासोबत त्यांच्या पत्नी व शिक्षिका प्रतिभा गोसावी याही उपस्थित होत्या.