सचिन अहिवळे यांची भाजपाच्या सातारा जिल्हा कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ती

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. २३ नोव्हेंबर २०२३ | सातारा |
फलटण नगरपरिषदेचे माजी नगरसेवक सचिन रमेश अहिवळे यांची भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी आज भाजपाच्या सातारा जिल्हा कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ती केली आहे. निवडीचे पत्र जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी आज अहिवळे यांना प्रदान केले.

सचिन अहिवळे हे फलटण नगरपरिषदेचे माजी नगरसेवक असून त्यांच्या संघटनात्मक आणि सामाजिक कार्याची दखल घेऊन ही नियुती केल्याचे भाजपाच्या जिल्हा कार्यकारिणीने म्हटले असून अहिवळे यांसारख्या हुशार आणि कर्तबगार व्यतीमुळे भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्ह्यातील संगठन आणखी मजबूत होईल, अशी खात्री व्यक्त केली आहे.

भारतीय जनता पार्टीचे विचार समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचे काम आपण कराल, याबाबत आम्हास पूर्ण विश्वास आहे, असे पत्रात म्हटले आहे.

सचिन अहिवळे हे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!