भरधाव टँकरची महिलांना धडक; दोन ठार, एक गंभीर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. ६ जून २०२३ | सातारा |
पुणे – बंगळूर महामार्गावर आनेवाडी टोल नाक्याजवळ उडतारे (ता. वाई) गावच्या हद्दीत काल झालेल्या अपघातात दोन महिला जागीच ठार झाल्या तर एक मुलगी गंभीर जखमी झाली आहे. टँकरचालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला.

पुणे – बेंगलोर महामार्गावर आनेवाडी टोलनाक्याजवळ वाहनाच्या प्रतीक्षेत उभे असलेल्या महिलांना भरधाव टँकरने धडक दिली. टँकर क्रमांक (जीजे-२०व्ही-७४७३) चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला आहे. अपघातात दोन महिला ठार झाल्या असून त्यांची नावे अद्याप समजली नाहीत, तर सायली दिलीप कांबळे ही मुलगी जखमी झाली आहे. जखमी मुलीस उपचारासाठी सातारा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातानंतर महामार्गाचे पोलीस उपनिरीक्षक घनवट व इतर महामार्ग पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आहेत.

या अपघाताची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास हवालदार अवघडे, पोलीस हवालदार जाधव व पोलीस नाईक धुमाळ करीत आहेत.


Back to top button
Don`t copy text!