दैनिक स्थैर्य | दि. २ डिसेंबर २०२४ | फलटण |
माण तालुक्यातील श्रीपालवण बोथे येथील ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी सतीश भोसले यांना ‘महाराष्ट्र गोवा अचिव्हर्स सोशल अवॉर्ड २०२४’ पुरस्कार माजी केंद्रीय कायदेमंत्री अॅड. रमाकांत खलप यांच्या हस्ते व गोव्याचे माजी शिक्षणमंत्री सुभाष शिरोडकर, पद्मश्री आमदार रॉडल्फ फर्नांडिस यांच्या उपस्थितीत सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
ग्रामविकास, सामाजिक, शैक्षणिक व क्रिडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्या विविध क्षेत्रातील मान्यवरांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. सतीश भोसले हे फलटण तालुक्यातील सरडे गावचे रहिवासी असून ते सध्या माण तालुक्यातील बोथे, श्रीपालवण, वडगाव येथे ग्रामपंचायत अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी तेथे लोकाभिमुख केलेल्या कामांची दखल घेऊन हा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता.
पुरस्कार प्रदानप्रसंगी गजल गायक अजय नाईक चिंबेल गोवा, सरपंच संजय शिरोडकर, उद्योजक दिनेश उगडे, प्रा. डॉ. बी. एन. खरात आदी मान्यवर उपस्थित होते. या पुरस्काराबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भोसले यांचे अभिनंदन केले आहे.