पाकमध्ये एअरस्ट्राइकची अफवाह

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, दि.१९: गुरुवारी संध्याकाळी 7 वाजता
अचानक सर्व टीव्ही चॅनेल्सवर पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीर म्हणजेच PoK
मध्ये भारतीय सैन्याने एअर स्ट्राइक केल्याच्या बातम्या आल्या. परंतू,
10-15 मिनीटांनंतर या बातम्या काढून टाकण्यात आल्या आणि सांगण्यात आले की,
भारताने PoK मध्ये पिनपॉइंट स्ट्राइक केली आहे. न्यूज एजेंसी पीटीआयने या
पिनपॉइंट स्ट्राइकची माहिती दिली. यात निवडक दहशतवादी लॉन्चपॅड्स उद्धवस्त
झाले. या कारवाईत अनेक दहशतवादी मारले गेले आहेत.

दहशतवाद्यांच्या घुसखोरीसाठी अनेकदा सीजफायर वॉयलेशन करत आहे पाकिस्तान

सूत्रांनी
पीटीआयला सांगितले की, पाकिस्तान सरकार FATF च्या निगराणीतून वाचण्याचा
प्रयत्नांसोबतच जम्मू-काश्मीरात अस्थिरता पसरवण्यासाठी दहशतवाद्यांना मदत
करत आहे. मागच्या काही आठवड्यांपासून पाकिस्तानी सैन्य लाइन ऑफ कंट्रोल
(LoC)वर भारतातील निरपराध नागरिकांवर गोळीबार केला होता. दहशतवाद्यांना
घुसखोरीत मदत करण्यासाठी अनेकदा भारताच्या दिशेने गोळीबार करत आहेत. या
वर्षी 21 नागरिकांचा जीव पाकिस्तानच्या सीजफायर वॉयलेशनमुळे गेला आहे.

मागच्या वर्षी 26 फेब्रुवारीला पहिली एअर स्ट्राइक केली होती

मागच्या
वर्षी 14 फेब्रुवारीला पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्याला
प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय वायुसेनेने 26 फेब्रुवारीला पीओकेमध्ये
एअरस्ट्राइक केली होती. या एअरस्ट्राइकमध्ये वायुसेनेच्या 12 मिराज-2000
फाइटर जेटने बालाकोट, चकोटी आणि मुजफ्फराबादमध्ये बॉम्ब टाकले होते. यात
300 पेक्षा जास्त दहशतवादी मारले गेले होते. वायुसेनेने या मिशनला ‘ऑपरेशन
बंदर’नाव दिले होते.

29 सप्टेंबर 2016 ला पहिली सर्जिकल स्ट्राइक

18
सप्टेंबर 2016 ला जम्मू-काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये दहशतवाद्यांनी आर्मी
कॅम्पवर हल्ला केला होता. यात 18 भारतीय जवान शहीद झाले होते. याला
प्रत्युत्तर देण्यासाठी 29 सप्टेंबरच्या रात्री भारतीय सैन्याने POK मध्ये 3
किमी आत जाऊन दहशतवादी ठिकाणांवर हल्ला करुन सुखरुप परत आले होते. ही
पहिलीच वेळ होती, जेव्हा भारताने पीओकेमध्ये घुसून हल्ला केला होता. या
कारवाईत 40-50 दहशतवादी मारले होते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!