दैनिक स्थैर्य | दि. 28 जानेवारी 2024 | फलटण | गेल्या काही दिवसांपासून माझ्या नावाने अफवा पसरवली जात आहे की; खासदारकी लढवण्यासाठी माझी परवानगी आहे. परंतु असे काही नसून ही अफवाच आहे; यावर विश्वास ठेवू नये. सावध रहा ! असे सूचक मत विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्हाट्सअप स्टेटस द्वारे व्यक्त केले आहे.