रेल्वे भरती बोर्डाकडून ३,५४८ पदांसाठी भरतीची घोषणा; पदवीधर उमेदवारांना सुवर्णसंधी

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

भारतीय रेल्वेच्या विविध विभागांतर्गत नॉन-टेक्निकल पाॅपुलर कॅटेगरी (एनटीपीसी) प्रवर्गातील ३,५४८ पदवीधर पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, पात्र उमेदवारांना ६ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

स्थैर्य, सातारा, दि. १७ ऑक्टोबर : सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांसाठी एक मोठी संधी समोर आली आहे. रेल्वे भरती बोर्डाकडून (आरआरबी) जारी करण्यात आलेल्या केंद्रीकृत रोजगार सूचनेनुसार, देशभरातील रेल्वे क्षेत्रांमध्ये पदवीधर उमेदवारांसाठी ३,५४८ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने गुड्स ट्रेन मॅनेजर, चिफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर, ज्युनियर अकाउंट्स असिस्टंट कम टायपिस्ट आणि सीनियर क्लर्क कम टायपिस्ट या पदांचा समावेश आहे.

पात्रता आणि अर्ज करण्याची प्रक्रिया

या भरतीसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी धारण केलेले आणि १८ ते ३३ वर्षे वयोगटातील तरुण अर्ज करण्यास पात्र आहेत. इच्छुक उमेदवारांना अधिकृत वेबसाइटच्या माध्यमातून ६ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ११:५९ वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करता येणार आहेत. संगणक आधारित परीक्षा (CBT), कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणीच्या आधारे या पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

 

 

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!