फलटणच्या रोहन बाबर यांची मोठी झेप; कर्करोगावरील संशोधनासाठी मिळाली पीएच.डी.

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

फलटणचे सुपुत्र रोहन बाबर यांना फरीदाबाद येथील रिजनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजीकडून कर्करोगावरील संशोधनासाठी पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे.

स्थैर्य, फलटण, दि. ०६ ऑगस्ट : येथील मूळ रहिवासी आणि गुणवंत विद्यार्थी रोहन राजीव बाबर यांना फरीदाबाद येथील ‘रिजनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी’ (RCB) या संस्थेकडून पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे. त्यांनी नुकतेच आपल्या शोधप्रबंधाचे यशस्वी सादरीकरण केले असून, त्यांच्या या यशामुळे फलटणच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

अत्यंत महत्त्वाच्या विषयावर संशोधन

रोहन बाबर यांनी ‘स्टडीज ऑन द रोल ऑफ डीसुमोयलेसेस इन कोलायटिस-असोसिएटेड कोलोरेक्टल कॅन्सर’ (CAC) या अत्यंत महत्त्वाच्या आणि आव्हानात्मक विषयावर आपले संशोधन पूर्ण केले आहे. वैद्यकीय आणि कर्करोग संशोधन क्षेत्रातील हे एक उल्लेखनीय पाऊल मानले जात आहे.

शैक्षणिक प्रवास आणि कौतुक

रोहन हे फलटण येथील मुधोजी हायस्कूल आणि बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी चिकाटीच्या जोरावर राष्ट्रीय पातळीवरील संशोधन संस्थेतून हे मोठे यश संपादन केले आहे. त्यांच्या या बहुमानाबद्दल प्राध्यापक, प्राचार्य आणि मित्रपरिवाराकडून त्यांचे कौतुक होत आहे.

Back to top button
Don`t copy text!