धनंजयराव गाडगीळ महाविद्यालयात रस्ते सुरक्षा कार्यक्रम संपन्न

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, सातारा, दि.२२: जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, वाहतूक नियंत्रण शाखा  व धनंजयराव गाडगीळ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाच्या सभागृहात रस्ते सुरक्षा आणि अपघात जागरुकता कार्यक्रम साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमास जिल्हा न्यायाधीश-2 बी.एस. वावरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण, सहा. पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुरव, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. प्रतिभा गाकयवाड यांच्यासह विद्यार्थी, विद्यार्थींनी उपस्थित होते.

यावेळी जिल्हा न्यायाधीश-2 बी.एस. वावरे यांनी अपघातानंतर होणारी न्यायालयीन कारवाई, तसेच द्यावी लागणारी नुकसान भरपाई व कायद्याचे उल्लंघन केल्याने होणारी शिक्षा व त्याचे परिणाम या‍ विषयी मार्गदर्शन केले.

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी सुरक्षेविषयी घ्यावयाची काळजी, रस्ते नियमांचे पालन व त्याचे परिणाम या विषयी माहिती दिली. तर सहा. पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुरव यांनी चित्रफित आणि पीपीटी दाखवून वाहन चालविण्याबाबतचे नियमांची माहिती दिली.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!