दैनिक स्थैर्य । दि. 27 नोव्हेंबर 2024 । फलटण । फलटण शहर पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांच्या मार्गदर्शनात शहर पोलीसांनी फलटण बसस्थानकातील हुल्लडबाज युवकांवर धडक कारवाई करत आपला पोलीसी खाक्या दाखवला आहे.
काल, दि.26 रोजी सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास फलटण एस.टी. बस स्थानकात काही युवक हुल्लडबाजी करत गोंधळ घालत होते. त्यांना पोलीसांनी ताब्यात घेऊन महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 110/117 नुसार कारवाई केली.
फलटण बसस्थानकात प्रवाशांची नेहमीच रेलचेल असते. त्यात परगावहून शिक्षणासाठी येणार्या विद्यार्थी – विद्यार्थीनींची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे या गर्दीच्या ठिकाणी अनुचित प्रकार घडत असल्याच्या तक्रारी वारंवार येत असल्याने बसस्थानकात पोलीस मनुष्यबळ नेमण्यात आलेले आहे.