दैनिक स्थैर्य । दि. २७ सप्टेंबर २०२२ । सातारा । माहे जानेवारी 2021, मे 2022 या कालावधीत मुदत संपलेल्या व जून 2022 ते सप्टेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या तसेच नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या सदस्य पदासह (थेट सरपंच पदाच्या ) सार्वत्रिक निवडणुकीचा सुधारित कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने कळविला आहे.
या कार्यक्रमानुसार आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक 16 ऑक्टोबर (रविवार सकाळी 7.30 पासून ते सायं. 5.30 पर्यंत). मतमोजणी व निकाल घोषित करण्याचा दिनांक सोमवार 17 ऑक्टोबर 2022 . जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निकालाची अधिसूचना प्रसिध्द करण्याचा अंतिम दिनांक गुरुवार 20 ऑक्टोबर 2022.