दैनिक स्थैर्य । दि. १८ जानेवारी २०२३ । सातारा । यंदाचा महाराष्ट्र केसरी ठरलेल्या राक्षेवाडी तालुका खेड येथील शिवराज राक्षे व उपकेसरी महेंद्र गायकवाड यांनी खासदार उदयनराजे भोसले यांची पुणे येथे भेट घेतली. उदयनराजे भोसले यांनी शिवराज चा पगडी आणि चांदीची गदा देऊन सत्कार केला.
महाराष्ट्र केसरी विजेत्या शिवराज राक्षे यांच्यावर सध्या कौतुकाचा वर्षाव सुरू आहे. स्पर्धेचे विजेतेपद मिळाल्यामुळे ठीक ठिकाणी शिवराज राक्षे यांचा सत्कार सुरू आहे. शिवराज च्या या यशाची दखल साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी घेतली त्यांनी पुण्यात महाराष्ट्र केसरी विजेता शिवराज राक्षे आणि उपकेसरी महेंद्र गायकवाड या दोघांचा सत्कार केला शिवराजला यावेळी पुणेरी पगडी आणि गदा देऊन सन्मानित करण्यात आले. मोठ्या स्पर्धांच्या ठिकाणी राजकारण पाहायला मिळतं ते थांबायला हवे चांगला खेळाडूंना योग्य ती संधी मिळायलाच हवी त्यासाठी कोणी प्रस्तावना देण्याची गरज नाही असे मत उदयनराजे यांनी व्यक्त केले चांगल्या खेळाडूंना राज्य सरकारने जास्तीत जास्त प्रोत्साहन दिले पाहिजे तरच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार होतील असे ते म्हणाले.
महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे नियोजन अतिशय उत्कृष्ट होते कुस्ती या खेळाला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. कठोर मेहनतीच्या जोरावर शिवराजने महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला त्याला मनापासून शुभेच्छा या शब्दात उदयनराजे यांनी शिवराज चे कौतुक केले.