माजी सैनिक प्रशिक्षण व उत्पादन केंद्रातून निवृत्त मेजर भानुदास जरे यांची निवृत्ती

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. १५ जून २०२२ । सातारा । माजी सैनिक प्रशिक्षण व उत्पादन केंद्र या संस्थेतून निवृत्त मेजर भानुदास जरे यांनी नुकतीच निवृत्ती घेतली आहे. श्री. जरे हे 24 मार्च 1976 मध्ये सैन्य दलात शिपाई या पदावर भरती झाले होते. शिपाई ते मेजर पदापर्यंत त्यांनी सैन्य दलातील काम केले आहे. सैन्य दलाच्या निवृत्तीनंतर त्यांनी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी म्हणूनही अत्यंत चांगल्या पद्धतीने केले आहे. या पदावरुन निवृत्त झाल्यानंतर त्यांनी माजी सैनिक प्रशिक्षण व उत्पादन केंद्राचे काम पाहिले. या केंद्रात त्यांनी विविध उपाययोजना करुन केंद्राच्या उत्पादनवाढीबरोबर तेथील कामगारांना कशा प्रकारे जास्तीचा लाभ देता यईल यासाठी श्री. जरे यांनी नेहमीच प्रयत्न केले आहेत.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!