दैनिक स्थैर्य | दि. 12 ऑक्टोबर 2024 | फलटण | सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा फलटण तालुक्याचे नेते श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर फलटण तालुकाध्यक्ष जयकुमार इंगळे व शहराध्यक्ष प्रमोद निंबाळकर यांनी सुद्धा आपल्या पदाचे राजीनामे हे राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस श्रीनिवास शिंदे यांच्याकडे दिले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की; श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व आमदार दीपक चव्हाण हे येत्या 14 तारखेला शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासोबत फलटण तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी सुद्धा अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या आपल्या पदाचा राजीनामा देत श्रीमंत संजीवराजे यांच्यासोबत पक्षांतर करणार आहेत.