राजाळे गावाजवळ कत्तलीसाठी जाणार्‍या चार जर्शी गाईंची सुटका

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २५ जून २०२४ | फलटण |
जर्शी जातीच्या चार गाई दाटीवाटीने भरून चारापाण्याची सोय न करता कत्तलीसाठी बेकायदेशीरपणे घेऊन जात असताना सोमवार, दि. २४ जून २०२४ रोजी सायंकाळी ७.३० वाजता जयवंतनगर (राजाळे), ता. फलटण गावच्या हद्दीत फलटण ग्रामीण पोलिसांनी पकडून त्यांची सुटका केली आहे. यावेळी पोलिसांनी गाईंची वाहतूक करणार्‍या महिंद्रा पिकअप (केए-७१-११२२) वाहनासह एकूण ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी मोहम्मद दादान शेख, इस्माईल राजसाहेब शेख व मुनीर अमन शेख (सर्व राहणार उगार खुर्ता, तालुका अथणी, जिल्हा बेळगाव) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

यावेळी पोलिसांनी २०,००० रुपये किमतीची एक काळी व पांढर्‍या रंगाची ३ ते ४ वर्षै वय असलेली एक जर्शी जातीची गाई, एक २०,००० रुपये किमतीची एक काळी-पांढर्‍या रंगाची ३ ते ४ वर्षै वय असलेली जर्शी गाई, एक १५,००० रुपये किमतीची एक काळी व पांढर्‍या रंगाची ३ ते ४ वर्षे वय असलेली जर्शी गाई, एक २५,००० रुपये किमतीची काळी पांढर्‍या रंगाची ४ ते ५ वर्षे वय असलेली जर्शी जातीची गाई व ४,००००० रुपये किमतीचे महिंद्रा पिकअप वाहन असा एकूण ४,८०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

अधिक तपास एएसआय हांगे करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!