दैनिक स्थैर्य | दि. २२ सप्टेंबर २०२३ | फलटण |
बरड (ता. फलटण) गावच्या हद्दीत दि. काल रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास महिंद्रा पिकअप टेम्पोमधून म्हैस जातीचे २१ रेडे दाटीवाटीने भरून चारापाण्याची सोय न करता बेकायदेशीरपणे कत्तलीसाठी घेऊन जाताना पोलिसांनी पकडले असून यावेळी पोलिसांनी टेम्पोसह सुमारे ४ लाख ८१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी टेम्पोचालक मुज्जफर जावेद कुरेशी याच्यावर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पो.हवा.चांगण करत आहेत.