दैनिक स्थैर्य | दि. २५ जानेवारी २०२४ | फलटण |
रक्तदान हे श्रेष्ठदान मानले जाते, कारण एखाद्या गंभीर रुग्णाचा जीव वाचवायला रक्त हे गरजेचे असते. तुमचे एक ‘रक्तदान’ हे तीन जणांचा प्राण वाचवू शकते. त्यामुळे रक्तदान करून आपण कोणाचा तरी जीव वाचवत असतो. त्यासाठी इंडियन डेंटल असोसिएशनच्या बारामती, फलटण शाखेतर्फे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.
दि. २६ जानेवारी २०२४ रोजी प्रजासत्ताक दिनी सकाळी ८.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत फलटण मेडिकल फाउंडेशन ब्लड बँक, फलटण येथे उपस्थित राहून रक्तदान करून राष्ट्रसेवेच्या कार्यास हातभार लावावा आणि समाजाच्या आणि देशहिताच्या कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन इंडियन डेंटल असोसिएशन बारामती, फलटण शाखेचे अध्यक्ष डॉ. प्रीतेश दोशी, सचिव डॉ. मनोज गांधी, खजिनदार डॉ. सोनिया शहा यांच्यासह सर्व पदाधिकार्यांनी केले आहे.