फलटण तालुक्यात १ तर जिल्ह्यात ७० संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित


स्थैर्य, सातारा, दि. २० : जिल्ह्यात काल शुक्रवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 70 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 2 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये

फलटण तालुक्यातील गुणवरे 1

सातारा तालुक्यातील सातारा 7, संगमनगर 2, शहूपुरी 1, सैदापूर 1, कोडोली 1, वेळे 1, गोवे 1, देगाव 1, सातारा रोड 1, मोळाचा ओढा 1

कराड तालुक्यातील मलकापूर 2, फडतरवाडी 1, पाडळी 3, गायकवाडवाडी 1,

पाटण तालुक्यातील शेंडेवाडी 1

वाई तालुक्यातील आझर्डे 1, कवठे 2, माठेकरवाडी 1, ,

खटाव तालुक्यातील नांदोशी 1, डंभेवाडी 1, जायगाव 1, पुसेगाव 1, कातरखटाव 2, मांडवे 2

माण तालुक्यातील दहिवडी 3, बिदाल 1,
कोरेगाव तालुक्यातील तारगाव 2, रुई 1, एकसळ 1, सासुर्वे 3

खंडाळा तालुक्यातील खंडाळा 1, लोणंद 1, अहिरे 2, सुखेड 1, शिरवळ 2

महाबळेश्वर तालुक्यातील भिलार 4, महाबळेश्वर 1, पाचगणी 1

जावली तालुक्यातील जावळी 1, करहर 1, पिंपळी 1, कारंडी 4,
इतर 1

दोन बाधितांचा मृत्यू
जिल्ह्यातील विविध खाजगी हॉस्पिटलमध्ये इस्लामपूर, ता. वाळवा येथील 81 वर्षीय व खंडाळा येथील 57 वर्षीय महिला या दोन कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.


एकूण नमुने -335874
एकूण बाधित -57881
घरी सोडण्यात आलेले -55049
मृत्यू -1847
उपचारार्थ रुग्ण-985


Back to top button
Don`t copy text!