स्थैर्य, फलटण, दि. २४: फलटण येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेल्या शासकीय विश्रामगृह याची दुरुस्ती तातडीने करावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे यांनी अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांच्याकडे केलेली आहे.
फलटण शहरामध्ये महत्त्वाच्या ठिकाणी असलेले सार्वजनिक बांधकाम विभागाचे शासकीय विश्रामगृह हे अतिशय नादुरुस्त झाले असून तेथील रंगकाम व फर्निचरचे ही अवस्था अतिशय दयनिय झालेली आहे. फलटण शहरा मध्ये असणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासकीय विश्रामगृह यामधील जुन्या इमारतीमध्ये असणारे फर्निचर व इतर सामग्रीची अवस्था अत्यंत वाईट झालेली आहे. तरी याची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी जयकुमार शिंदे यांनी केलेली आहे.
जयकुमार शिंदे यांच्याबरोबर सदर मागणी करताना भाजपा किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष धनंजय पवार, भटक्या विमुक्त सेलचे तालुकाध्यक्ष सुनील जाधव व नाना आडते यांची प्रमुख उपस्थिती होती.