ग्राहक प्रबोधन समितीच्या पाठपुराव्यानंतर वाघमोडेदरा येथील रस्ता दुरुस्त


 

स्थैर्य, वावरहिरे, दि.२६: ग्राहक प्रबोधन समितीच्या कार्यकर्त्यांच्या पाठपुराव्यामुळे माण तालुक्यातील वाघमोडेदरा येथील बर्‍याच दिवसांपासून नादुरुस्त स्थितीत असलेला रस्ता दुरुस्त झाला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, वावरहिरे ता.माण येथील ग्रामपंचायतीच्या हद्दीत येणार्‍या वाघमोडेदरा येथील रस्त्याची पावसाच्या पाण्याने मोठ्या प्रमाणात दुरावस्था झालेली होती. रस्त्यात ठिकठिकाणी टाकण्यात आलेल्या नळ्या पावसाच्या पाण्याने उघड्या होवुन मोठ्या प्रमाणात रस्ता खचल्याने येथील नागरिकांना ये-जा करताना तारेवरची मोठी कसरत करावी लागत होती. सदर रस्ता दुरुस्तीसाठी येथील नागरिकांनी स्थानिक ग्रामप्रशासनाकडे वारंवार मागणी करुनही स्थानिक ग्रामप्रशासन याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करत होते. यासंबंधी ग्राहक प्रबोधन समितीचे माण तालुका अध्यक्ष राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष नितीन हुलगे, एकनाथ वाघमोडे व विशाल हुलगे यांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे सदर रस्ता दुरुस्तीची निवेदनाद्वारे मागणी करुन येथील नागरिकांची होणारी गैरसोय दुर करावी; अन्यथा ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकुन कामकाज ठप्प करुन आमरण उपोषण करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला होता. 

मकरंद अनासपुरे, इंदोरीकर महाराज, झहीर खान, डॉ. प्रकाश आमटे यांच्यासह 12 नावे घेऊन सदाभाऊ खोत राज्यपालांच्या भेटीला

या इशार्‍यानंतर स्थानिक प्रशासनाने पुढाकार घेत ग्रामसेवक हर्षल शिंदे व ग्रामपंचायत सदस्य संदिप अवघडे यांनी तत्परता दाखवत उघड्या झालेल्या नळ्या व खचलेला रस्ता यावर जेसेबीच्या सहाय्याने मुरुम टाकुन सदर रस्ता नागरिकांना ये-जा करण्यास सुव्यवस्थित करुन दिला

सदर रस्ता दुरुस्त झाल्यानंतर ग्राहक प्रबोधन समितीचे सर्व पदाधिकारी, ग्रामसेवक हर्षल शिंदे, ग्रामपंचायत सदस्य संदिप अवघडे, अध्यक्ष राजेंद्र मुळीक या सर्वांचे वाघमोडेदरा येथील ग्रामस्थांनी विशेष आभार मानले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!