मराठी चित्रपटांच्या अर्थसहाय्य मंजूरी, दर्जा निश्चितीसाठी चित्रपट परीक्षण समितीची पुनर्रचना

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २८ जानेवारी २०२३ । मुंबई । दर्जेदार मराठी चित्रपट निर्मितीस अर्थसहाय्य मंजूर करण्यासाठी, चित्रपटांचे परीक्षण करुन दर्जा निश्चित करण्यासाठी चित्रपट परीक्षण समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय नुकताच पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाने निर्गमित केला आहे.

ही पुनर्रचित समिती आता अर्थसहाय्याची शिफारस करेल. या समितीमध्ये अविनाश नारकर, सुकन्या कुलकर्णी, योगेश सोमण, संतोष पाठारे, अलका कुबल, तेजस देऊसकर, विद्या करंजीकर, दिग्पाल लांजेकर, महेश कोळी, अभिजीत साटम, समीर आठल्ये, सचिन परब, डॉ. जयश्री कापसे, शैलेंद्र पांडे, श्रीरंग देशमुख हे १५ अशासकीय सदस्य असतील. तर महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक हे या समितीचे सदस्य सचिव असतील. या समितीचा कार्यकाळ शासन निर्णयाच्या दिनांकापासून तीन वर्ष अथवा शासनाचे पुढील आदेश होईपर्यंत यापैकी अगोदर जे घडेल तोपर्यंत असेल.

चित्रपट परीक्षणाकरीता ३३ टक्के सदस्यांची उपस्थिती आवश्यक राहील. समिती सदस्यांनी केलेल्या शिफारशींवर योजनेतील तरतुदीनुसार महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांच्यामार्फत कार्यवाही करण्यात येईल.


Back to top button
Don`t copy text!