
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य । 13 जून 2025। फलटण । श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 2026 च्या अनुषंगाने आळंदी-पंढरपूर पालखी महामार्गाच्या फलटण तालुक्यातील अपूर्ण कामामुळे येणारे अडथळे दूरकरणेबाबत आढावा बैठक तहसिल कार्यालय फलटण येथे पार पडली. पालखीच्या आगमनापूर्वी सर्व अपूर्ण कामे त्वरित व व्यवस्थित करून घ्यावे असे निर्देश आमदार सचिन पाटील यांनी दिले.
या बैठकीस माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, प्रांताधिकारी सौ. आंबेकर, संजय कदम, तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव, नायब तहसीलदार अभिजीत सोनावणे, गटविकास अधिाकरी कुंभार, श्री. आंबेकर, पोलिस प्रशासन, मुख्याधिकारी , कृषी विभाग, सार्वजनिक बांधकाम, जलजीवन विभागाचे अधिकारी उपस्थित होते



