“मुख्यमंत्री लाडकी बहीण” योजनेसाठी फलटण तालुक्यात 41 हजार 170 महिलांची नोंदणी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. 23 जुलै 2024 | फलटण | गरीब महिलांना मदत, तसेच त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी राज्य शासनातर्फे ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेमध्ये फलटण तालुक्यातील 41 हजार 170 महिलांनी ऑनलाइन व ऑफलाईन स्वरूपात नोंदणी केली आहे. गरीब व गरजू महिलांसाठी ही योजना आर्थिकदृष्ट्या फायद्याची ठरणार आहे; असे मत फलटणचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी स्पष्ट केले आहे.

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी १ जुलैपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. ३१ ऑगस्ट ही अंतिम तारीख आहे. अंतिम यादी प्रकाशित झाल्यानंतर योजनेचा १ हजार ५०० रुपयांचा पहिला हप्ता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होईल. दर महिन्याच्या १५ तारखेपर्यंत या योजनेचा लाभ महिलांच्या बैंक खात जमा केला जाणार आहे. सरकारच्या वतीने महिलांच्या उत्थानासाठी विविध योजना आखल्या जात आहेत. शासनाने यामध्ये कोणतीही जाचक अशी अट ठेवली नाही; असेही प्रांताधिकारी ढोले यांनी यावेळी स्पष्ट केले.

यांना मिळणार योजनेचा लाभ?

लाभार्थी ही महाराष्ट्राची रहिवासी असणे आवश्यक, वयाची किमान २१ वर्षे तर कमाल ६५ वर्षे पूर्ण होईपर्यंत संबंधित महिलेला योजनेचा लाभ दिला जाईल. सदर लाभार्थ्यांचे बँक खाते असणे बंधनकारक आहे. लाभार्थी कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त नसावे.

विनामूल्य राहणार अर्ज भरण्याची प्रक्रिया

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज पोर्टल/मोबाइल अॅपद्वारे/सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाइन भरले जाऊ शकतात. पात्र महिलेस या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करता येईल. ज्या महिलेस ऑनलाइन अर्ज सादर करता येत नसेल, त्याच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात/बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये, ग्रामपंचायत / वॉर्ड/ सेतू सुविधा केंद्र येथे उपलब्ध असतील. भरलेला फॉर्म अंगणवाडी केंद्रात / बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये, सेतू सुविधा केंद्रांमध्ये नियुक्त कर्मचाऱ्यांद्वारे ऑनलाइन प्रविष्ट केला जाईल. अर्ज भरण्याची प्रक्रिया विनामूल्य राहील, असे आदेशात शासन निर्णयात नमूद आहे.


Back to top button
Don`t copy text!