UK हून येणाऱ्या फ्लाइट्सला 7 जानेवारीपर्यंत ‘रेड सिग्नल’

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, नवी दिल्ली, दि.३०: यूकेमध्ये कोरोना विषाणुचा (Coronavirus) नवा प्रकार आढळल्याने जगभरात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. UK त कोरोनाचा नवा प्रकार आढळल्यानंतर भारत सरकारने खबरदाचे पाऊल उचलत ब्रिटनहून येणाऱ्या प्लाइट्स स्थगित करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. 31 डिसेंबरपर्यंत ब्रिटनहून भारताच्या दिशेने होणारी विमान वाहतूक स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. नव्या वर्षाच्या सुरुवातीला देखील हे निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे.

केंद्रीय नागरी उड्डान मंत्रालयाने 7 जानेवारीपर्यंत ब्रिटनहून येणाऱ्या फ्लाइट्सवरील बंदी कायम ठेवण्याचा निर्णय घेतलाय. केंद्रीय नागरी उड्डान मंत्री हरदीप सिंह पुरी (Hardeep Sigh Puri) यांनी याविषयीची माहिती दिली आहे. 7 जानेवारी 2021 पर्यंत ब्रिटनहून येणारी आणि ब्रिटनला जाणारी अशी दोन्ही मार्गावरील विमान सेवा बंदच तात्पुरत्या स्वरुपात स्थगितच राहिल, असे त्यांनी सांगितले आहे. हरदीप पुरी यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. 7 जानेवारीनंतर महत्त्वाच्या सेवेसाठी विमान वाहतूकला परवानगी देण्यात येईल. यासंदर्भातील गाईड लाईन्स लवकरच घोषित करण्यात येणार असल्याचे केंद्रीय नागरी उड्डान मंत्र्यांनी म्हटले आहे.

ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा विषाणू आढळल्यानंतर सर्वत्र एकच खळबळ माजली होती. या वृत्तानंतर भारत सरकारने 21- 22 डिसेंबरपासून ब्रिटनमधून येणारी विमान वाहतूक स्थगिती करण्याचा निर्णय घेतला होता. 31 पर्यंत स्थिगित करण्यात आलेली विमानसेवा आता नव्या वर्षाच्या पहिल्या आठवड्यातही बंदच राहणार आहे. भारताशिवाय फ्रान्स, जर्मनी, नँदरलंड सह युरोपातील अन्य राष्ट्रांनीही ब्रिटनमधील वाहतूक सेवा स्थगित करण्याचा निर्णय़ घेतला आहे.

ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नव्या प्रकाराच्या संक्रमणामध्ये वाढ होताना दिसत आहेत. आतापर्यंत याठिकाणी 20 रुग्णांमध्ये कोरोनाचा नवा विषाणू आढळला आहे. मंगळवारी हा आकडा केवळ 6 होता. 24 तासांत 14 रुग्णांमध्ये कोरोनाचा नवा प्रकार आढळून आला आहे.


Back to top button
Don`t copy text!