दुर्दैवी घटना : जवानाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी गावकरी तयारीत; एक फोन आला, दुःखाचा डोंगर कोसळला


स्थैर्य, नंदुरबार, दि.३०  :  जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील  मोग्राणी गावातील जवान गडचिरोली येथे सेवा बजावत असताना हदविकाराने मृत्यू झाल्याची घटना काल सायंकाळी घडली. मात्र घटना घडण्यापूर्वी शहिद जवान दीपक लक्ष्मण गायकवाड व मोग्राणी गाव शहीद जवान यांच्या आज असलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याच्या तयारीत असतांना एक फोन आला आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्या एवजी गावावर श्रद्धांजली वाहण्याची वेळ आली.

नवापूर तालुक्यातील मोग्राणी येथील दिपक लक्ष्मण गायकवाड (32) हा एसआरपीएफ मध्ये सन 2014 साली भरती झाले होते. मंगळवारी गडचिरोली येथे सेवा बजावत असतांना दिपक लक्ष्मण गायकवाड याचा हृदयविकाराने दुर्दैवी मृत्यू झाला. दिपक गायकवाड याचा मृत्यू झाल्याची वार्ता सायंकाळी 10 वाजता येताच परिवारासह गावावर शोककळा पसरली.


Back to top button
Don`t copy text!